संजय राऊत हा सुधाकर बडगुजरचा गॉडफादर, त्याच्यावर देशद्रोहाचा…. नितेश राणे यांचा गंभीर आरोप

संजय राऊत हा सुधाकर बडगुजरचा गॉडफादर, त्याच्यावर देशद्रोहाचा…. नितेश राणे यांचा गंभीर आरोप

| Updated on: Feb 29, 2024 | 1:16 PM

'सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजरच तिथे नाचताना दिसले. पण बडगुजर हा महत्त्वाचा विषय नाही तर त्यांच्या गॉडफादर कोण? बडगुजर कुणाच्या मांडीला मांडी लाऊन बसतो तर ते संजय राजाराम राऊतसोबत...' म्हणून संजय राऊत यांचीही चौकशी झाली पाहिजे. देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे', असे नितेश राणे म्हणाले.

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याबाबत गंभीर आरोप केले होते. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत नाशिक शिवसेना ठाकरे गटाचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने पार्टी केली असा दावा नितेश राणे यांनी फोटा दाखवत मोठा गौप्यस्फोट केला होता. दरम्यान, ८ वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणावर आज गुन्हा दाखल झाला, अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली तर माझ्यासोबत ७ ते ८ जणांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी करत हेतू पुरस्सरपणे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. मात्र या प्रकरणी नितेश राणे यांनी पुन्हा भाष्य केले आहे. ‘पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती हे सिद्ध झाले आहे की, त्या पार्टीत सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजरच तिथे नाचताना दिसले. पण बडगुजर हा महत्त्वाचा विषय नाही तर त्यांच्या गॉडफादर कोण? बडगुजर कुणाच्या मांडीला मांडी लाऊन बसतो तर ते संजय राजाराम राऊतसोबत…म्हणून संजय राऊत यांचीही चौकशी झाली पाहिजे. देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे’, असे नितेश राणे म्हणाले.

Published on: Feb 29, 2024 01:16 PM