BJP Operation Lotus : भाजपात इनकमिंग सुरूच राहणार, साडेचार हजार शिवसैनिक कमळ घेणार हाती? रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य?
सध्या राज्याच्या राजकारणात स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मोठ्या प्रमाणत पक्षांतर करत आहे. नुकताच भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे यांची सेना आणि ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का दिल्यानंतर सूत्रांकडून मोठी माहिती समोर आली आहे.
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. भाजपचे ऑपरेशन कमळ सक्रिय असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनुसार, रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे साडेचार हजार शिवसैनिक भाजपच्या संपर्कात आहेत. इतकंच नाहीतर राज्यभरात इनकमिंग सुरूच राहणार असल्याचं देखील रवींद्र चव्हाण यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मित्रपक्ष आणि आमच्यात समन्वय असून महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेतही रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
विशेषतः ठाणे जिल्ह्यात भाजपमध्ये मोठे इनकमिंग सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रभागातही शिवसेनेचे आठ ते नऊ माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ही पक्षबदलाची लाट सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे.
Published on: Nov 19, 2025 12:17 PM
