Nawab Malik | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी भाजप कारणीभूत- नवाब मलिक

Nawab Malik | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी भाजप कारणीभूत- नवाब मलिक

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 7:40 AM

दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याला भाजप कारणीभूत होता, ही सत्य परिस्थिती आहे, असं सांगतानाच आता तिसऱ्या लाटेलाही भाजपच जबाबदार ठरणार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याला भाजप कारणीभूत होता, ही सत्य परिस्थिती आहे, असं सांगतानाच आता तिसऱ्या लाटेलाही भाजपच जबाबदार ठरणार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. (NCP Spokesperson Nawab Malik slams bjp over jan ashirwad yatra)

Published on: Aug 21, 2021 07:40 AM