Kabutar Khana : कबुतरखान्यात दाणे टाकले नाही मी तर माझ्या कारच्या टपावर…. पठ्ठ्याचं थेट कोर्ट, पोलीस अन् BMC लाच चॅलेंज
गेल्या आठवड्यातच जैन समाजाकडून या निर्णयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. असे असतनाही न्यायालयाने कबुतराखाना बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
मुंबईतील कबुतरखान्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये दादर येथील सर्वात प्रसिद्ध आणि लँडमार्क असलेल्या दादर कबुतरखान्याचाही समावेश आहे. दरम्यान, कबुतरांना धान्य, दाणे टाकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, या कारणास्तव कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणा-पाणी देण्यास मनाई करण्यात आली आहे. निर्णयानंतर काही कबुतरप्रेमी आणि जैन समाजाने आक्रमक होत आपला विरोध दर्शवत निराजी व्यक्त केली. असे असतानाही नागरिकांकडून कबुतरखान्यात धान्य टाकल्याचे व्हिडीओ काही समोर येत आहे.
मुंबईतील लालबाग येथून एक व्यक्ती आपली कार घेऊन दादरच्या कबुतरखाना परिसरात आला आणि त्या कारच्या छतावर त्याने कबुतरांना दाणे ठेवण्याचे दिसतंय. हा व्यक्ती लालबागचा असून तो कबूतरांना खाद्य-दाणे देण्यासाठी दादरला आला. यावेळी त्याला स्थानिक नागरिकांना अडवलं असता त्याची मुजोरी पाहायला मिळाली होती. त्याचाच एक नवा व्हिडीओ आता समोर आलाय.
