लसीचे दोन डोस घेतलेल्यांना विशेष पास देणार, मुंबई महापालिका आयुक्तांची महत्त्वाची माहिती

| Updated on: Aug 09, 2021 | 2:45 PM

कोरोना लसीचे दोन डोस मिळालेल्या व्यक्तींना विशेष पास मिळणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर ज्यांचे 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यांना 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

Follow us on

कोरोना लसीचे दोन डोस मिळालेल्या व्यक्तींना विशेष पास मिळणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर ज्यांचे 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यांना 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येणार आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवसांचा वेळ अँटिबॉडीज तयार व्हायला लागतात. त्यामुळे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्यांना राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि रेल्वे विभाग यांच्याकडून नागरिकांना फोटो असलेलं ओळखपत्र देण्यात येणार आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेली व्यक्ती इतरांना संसर्गित करु शकणार नाही. या पासचा इतर ठिकाणी वापर करता येईल, असं महापालिका आयुक्त इक्बाल चहल म्हणाले.