BMC Elections : कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात, कोणाला कुठे उमेदवारी?
कुलाब्यातून नार्वेकर कुटुंबातील तीन सदस्य बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर आणि गौरवी शिवलकर नार्वेकर हे भाजपच्या तिकिटावर विविध प्रभागांतून लढणार आहेत. पुण्यात शिवसेना-भाजप युतीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी उदय सामंत आणि नीलम गोऱ्हे यांच्यात चर्चा सुरू आहे.
बीएमसी निवडणुकीसाठी कुलाब्यातून नार्वेकर कुटुंबातील तीन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर आणि गौरवी शिवलकर नार्वेकर यांचा समावेश आहे. भाजपने हर्षिता नार्वेकर यांना प्रभाग क्रमांक २२५ मधून, मकरंद नार्वेकर यांना प्रभाग क्रमांक २२६ मधून तर गौरवी शिवलकर नार्वेकर यांना प्रभाग क्रमांक २२७ मधून उमेदवारी दिली आहे.
याचदरम्यान, पुण्यातील भाजप आणि शिवसेना युतीबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. युतीसंदर्भातील चर्चा करण्यासाठी उदय सामंत पुण्यात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सामंत यांना तातडीने बैठकीसाठी पाठवले आहे. नीलम गोऱ्हे देखील या बैठकीत सहभागी झाल्या असून, या बैठकीनंतर युतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Published on: Dec 30, 2025 11:10 AM