Anant-Radhika Wedding : राजकीय नेत्यांपासून ते अवघं बॉलिवूड अंबानींच्या लग्नात, पण अक्षय कुमार जाणार नाही, कारण…
आज अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा विवाह संपन्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाला बड्या राजकीय नेत्यांपासून अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी हा स्वत: अक्षय कुमारच्या घरी गेला होता आणि लग्नाची पत्रिका त्याला दिली होती. मात्र...
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या शाही लग्नाची उत्सुकता होती ती आज अखेर संपणार आहे. कारण आज अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांचा विवाह संपन्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाला बड्या राजकीय नेत्यांपासून अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी हा स्वत: अक्षय कुमारच्या घरी गेला होता आणि लग्नाची पत्रिका त्याला दिली होती. मात्र आता अवघं बॉलिवूड अंबानींच्या लग्न सोहळ्यात हजर होणार असताना अक्षय कुमार मात्र जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. कारण अक्षय कुमार कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याच्या सरफिरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. प्रमोशन टीमशी संबंधित काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्याला बाकीच्या टीमकडून कळले, यावेळी अक्षय कुमारनेही कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि तो पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी सकाळी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तो योग्य ती खबरदारी घेत आहे. त्याने स्वत:ला पूर्णपणे आयसोलेट केल्याचे सांगितले जात आहे.
