सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक
वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही कारवाई करण्यात आली. त्याला मध्यरात्री चेंबूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या टीमकडून आरोपीची चौकशी करण्यात आली.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. विजय दास असे आरोपीचे नाव आहे. काल मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येत आहे. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही कारवाई करण्यात आली. त्याला मध्यरात्री चेंबूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या टीमकडून आरोपीची चौकशी करण्यात आली. चेंबूरनंतर आरोपीला पहाटे ४ वाजता खार पोलिसांत आणण्यात आले. या कारवाईनंतर आज सकाळी ९ वाजता मुंबई पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील अपडेट देणार आहेत.
Published on: Jan 19, 2025 08:48 AM
