Saif Ali Khan Discharge Video : ‘लिलावती’तून डिस्चार्ज अन् सैफ अली खान पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर…बघा VIDEO
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अखेर 6 दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.
अभिनेता सैफ अली खानला आज लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच दिवसांच्या उपचारानंतर अखेर आज सैफला डिस्चार्ज देण्यात आला आहे. लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर सैफ अली खान हा त्याच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या फॉर्च्युन हाइट्समध्ये राहण्यासाठी गेलाय. हे त्याचं दुसरं घर असून ते वांद्र्यातच आहे. सैफवर करण्यात आलेल्या उपचारानंतर सध्या प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सैफ अली खान हा त्याच्या कारने लिलावती रुग्णालयातून घरी परतला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खान पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या गुरूवारी सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराकडून सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले होते. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली होती तर मणक्यावरही चाकूचे वार करण्यात आले होते. यानंतर तातडीने अभिनेत्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
