आता बॉलिवूडच्या किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी, मोठी माहिती समोर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने शाहरूख खानच्या घराची रेकी केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या या माहितीनंतर बॉलिवूड विश्वातील कलाकारांमध्ये एकच भितीचं वातावरण पसरलं आहे
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरूख खानच्या घराची रेकी करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने शाहरूख खानच्या घराची रेकी केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या या माहितीनंतर बॉलिवूड विश्वातील कलाकारांमध्ये एकच भितीचं वातावरण पसरलं आहे. तर आरोपींकडून रेकी करण्यात आल्याने शाहरूख खानच्या जीवाला धोका? असल्याची चर्चाही सुरू आहे. सैफ अली खानवर हल्ला होऊन 24 तासांहून अधिक काळ झाला आहे. तरीही मुख्य आरोपी पोलिसाच्या तावडीत सापडलेला नाही. सैफ अली खानवर काल मध्यरात्री दोन वाजता चोराकडून चाकूने हल्ला करण्यात आला. मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी ही घटना घडली. मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरासोबत सैफ अली खानची झटापट झाली. सुरूवातीला चोराने घरातील नोकरासोबत वाद घातला. या वादाचा आवाज ऐकून सैफ झोपेतून उठला आणि चोरासा पकडण्याच प्रयत्न केला. यावेळी चोराने सैफ अली खानवर चाकूने तब्बल सहा वार केले. यात त्याला गंभीर दुखापत झाली.
