Saif Ali Khan Attack :  सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर घरात शिरलाच कसा? नेमकं काय-काय घडलं बघा?

Saif Ali Khan Attack : सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर घरात शिरलाच कसा? नेमकं काय-काय घडलं बघा?

| Updated on: Jan 17, 2025 | 10:40 AM

मुंबईतील वांद्रे येथील सतगुरू शरण सोसायटीत सैफ अली खान १२ व्या मजल्यावर राहतो. हल्लेखोराने चाकूचे सहा वार सैफवर केलेत यानंतर त्याला लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरानं त्याच्याकडून एक कोटी रूपयांची मागणी केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. मात्र मुंबईतील एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल सोसायटीत हल्लेखोर शिरलाच कसा? असा सवाल सध्या चर्चेत आहे. मुंबईतील वांद्रे येथील सतगुरू शरण सोसायटीत सैफ अली खान १२ व्या मजल्यावर राहतो. हल्लेखोराने चाकूचे सहा वार सैफवर केलेत यानंतर त्याला लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं. हल्ल्यात सैफच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली. शस्त्रक्रियेत सैफच्या मणक्यातून ३ इंचाचा तुकडा काढला. तर मानेवरही जखम झाली असून प्लास्टिक सर्जरी कऱण्यात आली. यासोबत डाव्या हातावर दोन जखमा, तर उजव्या हातावर चाकूने खरचटल्याच्या दोन खुणा आहेत. आता प्रश्न हा आहे की, हल्लेखोर सैफच्या घरात शिरलाच कसा? सैफ ज्या इमारतीत राहतो त्याच्या शेजारी पेटफिना नावाची इमारत आहे. या तीन मंजली इमारतीला सहज उघडता येईल असं गेट आहे. हल्लेखोर त्याच गेटमधून आत शिरला आणि भितींवर चढून सैफच्या घरात शिरला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 17, 2025 10:40 AM