दोन्ही भावांनी एकत्रच रहावे, त्यांना…ठाकरे बंधू भेटीवर काय म्हणाले फडणवीस ?

दोन्ही भावांनी एकत्रच रहावे, त्यांना…ठाकरे बंधू भेटीवर काय म्हणाले फडणवीस ?

| Updated on: Aug 27, 2025 | 2:20 PM

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे सह कुटुंब दाखल झाले आहेत. त्यांनी राज ठाकरे यांच्या गणेशाचे दर्शन घेतले आहे.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्मिक भाष्य केले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गणपतीच्या उत्सवानिमित्त पुन्हा एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे गणपती दर्शनासाठी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या दादर शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ येथे दाखल झाले आहेत. या भेटीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होणार का याकडे राजकीय लोकांचे लक्ष लागले आहे. त्यातच राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर २० वर्षांनी उद्धव ठाकरे राज यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्मिक भाष्य केले आहे.दोन्ही भावांनी एकत्र राहाण्याची सुबुद्धी मिळावी आणि त्यांनी एकत्रच रहावे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

Published on: Aug 27, 2025 02:19 PM