India – Pakistan Conflict : बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
BSF destroys Pakistan tower : बीएसएफने ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं आहे. त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे.
बीएसएफने ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केल्याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. पाकिस्तानने 10 मे रोजी शस्त्रबंदीचं उल्लंघन केलं त्या दिवशीची ही कारवाई भारताकडून करण्यात आलेली होती. बीएसएफकडून हा टॉवर उद्ध्वस्त करण्यात आलेला होता. त्याचा व्हिडिओ आता पुढे आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचं उलंघन न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुपारी हा निर्णय जाहीर झाल्यानंतर लागलीच रात्री पाकिस्तानने हा नियम मोडून भारतावर हल्ला चढवला होता. यावेळी भारताकडून देखील या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. याच दरम्यान भारताच्या बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं होतं. त्याचा व्हिडिओ आता पुढे आला आहे.
Published on: May 16, 2025 04:36 PM
