विधानभवनाच्या पायऱ्यांवर गाजर हलव्याचा नारा; जयंत पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात हास्यविनोद

विधानभवनाच्या पायऱ्यांवर गाजर हलव्याचा नारा; जयंत पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात हास्यविनोद

| Updated on: Mar 13, 2023 | 12:38 PM

मविआकडून शिंदे-फडणवीस सरकार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी हातात गाजर घेत महाराष्ट्राचं बजेट गाजर हलवा या घोषणा मविआचे नेते देत होते

मुंबई : राज्याचे बजेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. त्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्राचं बजेट गाजर हलवा असल्याची टीका केली होती. आज देखिल गाजर हलवाचा नारा विधानभवनाच्या पायऱ्यांवर पहायला आणि ऐकायला मिळाला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत होतं. त्यामुळे मविआकडून शिंदे-फडणवीस सरकार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी हातात गाजर घेत महाराष्ट्राचं बजेट गाजर हलवा या घोषणा मविआचे नेते देत होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि त्यांचे लक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गेले. ते मध्येच थांबून तुम्ही ही गाजर दाखवा असेच बोलत असतील असे त्यांच्या हावभावावरून दिसून येत होतं. यावेळी जयंत पाटील आणि शिंदे यांच्यात हास्यविनोद सुरू असल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मविआचे नेते सरकारविरोधात घोषणा देत होते.

Published on: Mar 13, 2023 12:16 PM