राज्यातील पुढाऱ्यांसाठी खास बातमी! आता वाढदिवशी हुर्ररररर करता येणार नाही? शिंदे सरकारनं काय घेतला निर्णय?

| Updated on: May 27, 2023 | 4:21 PM

प्राणी मित्रांनी काही गोष्टींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली तयारी केली. नव्या नियमावलीनूसार गावचे संस्कृती परंपरेनुसारचे धार्मिक सण उत्सव, यात्रा यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात आलेली आहे.

Follow us on

मुंबई : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परवानगी दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला होता. मात्र आता या आनंदावर पाणी फिरलं आहे. प्राणी मित्रांनी काही गोष्टींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली तयारी केली. नव्या नियमावलीनूसार गावचे संस्कृती परंपरेनुसारचे धार्मिक सण उत्सव, यात्रा यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आता बैलगाडा शर्यतींवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे, राजकीय पुढारी किंवा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यती घेता येणार नाहीत असे परिपत्रकात म्हटलं आहे.