“..मात्र मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला”, शंकरराव गडाख यांची प्रतिक्रिया
"शिवसेना पक्षाबाबतची न्यायालयीन लढाई निकालात निघाल्यानंतरच येणाऱ्या काळात पक्ष आणि पक्षाचं काम स्पष्ट होऊ शकेल", अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली.
“ही वस्तुस्थिती आहे की आमदार नाराज होते. काही राजकीय नाराजी असेल, काही कामाच्या बाबतीत असेल. त्या त्या वेळेस उद्धव साहेबांनी मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्या आमदारांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मी मात्र या अडचणीच्या काळात उद्धव साहेबांसोबत राहिलोय. इतकी मोठी नाराज आणि त्यातून इतका मोठा स्फोट होईल याची कल्पना आम्हाला कोणालाच नव्हती. कदाचित उद्धव साहेबांनाही नसावी. परंतु दुर्दैवाने ते झालं. शिवसेना पक्षाबाबतची न्यायालयीन लढाई निकालात निघाल्यानंतरच येणाऱ्या काळात पक्ष आणि पक्षाचं काम स्पष्ट होऊ शकेल”, अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली.
Published on: Jul 11, 2022 01:37 PM
