Sanjay Shirsat : मंत्री शिरसाट यांना आयकर विभागाची नोटिस, स्वत:च केला मोठा खुलासा
कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटिस आली आहे.
कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटिस आली आहे. संभाजीनगरच्या विट्स हॉटेल प्रकरणी त्यांच्यावर काही गंभीर आरोप विरोधकांनी केले होते. त्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटिस आली आहे.
महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शिंदे गटासाठी मोठा झटका मानली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेलच्या लिलाव प्रकरणाशी संबंधित असल्याने ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीनंतर आयकर विभागाने शिरसाट यांच्यावर लक्ष केंद्रित केल्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वतः ही नोटीस मिळाल्याची कबुली दिली. यावेळी त्यांनी, यापुढे काळा पैसा चालणार नाही, असे वक्तव्य करत स्वतःलाही या विधानाचा संदर्भ असल्याचे सूचकपणे नमूद केले. या वक्तवाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
