सभेत तलवार दाखवणं अंगलट, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

सभेत तलवार दाखवणं अंगलट, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 1:38 PM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातल्या (Thane) नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. राज ठाकरेंची काल ठाण्यात सभा झाली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातल्या (Thane) नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. राज ठाकरेंची काल ठाण्यात सभा झाली. ह्या सभेत राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला होता. त्यांना भगवी शाल देण्यात आली होती आणि नंतर लगेचच तलवारही. भेट दिलेली तलवार राज ठाकरेंनी सभेला दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशाच प्रकारचा गुन्हा काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांवर मुंबईतही दाखल केला गेला होता. त्यानंतर आता राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झालाय.