CDS Bipin Rawat Funeral : जनरल बिपीन रावत अनंतात विलीन, मुलींनी दिला मुखाग्नी
दिल्लीत सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जड अंत:करणानं त्यांच्या दोन मुलींनी आपल्या आई-वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. तर जवानांनी १७ तोफांची सलामी दिली.
देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) पंचत्वात विलीन झाले. दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जड अंत:करणानं त्यांच्या दोन मुलींनी आपल्या आई-वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. तर जवानांनी 17 तोफांची सलामी दिली. लष्करी इतमामात हे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह पक्षांचे नेते उपस्थित होते.
Published on: Dec 10, 2021 09:20 PM
