Special Report | इंधन दर कपातीवरून राजकारण पेटलं

Special Report | इंधन दर कपातीवरून राजकारण पेटलं

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 8:47 PM

केंद्राने इंधनाच्या दरात कपात केली आता महाराष्ट्र सरकार असाच निर्णय घेणार का ? असा सवाल महाराष्ट्र भाजपने उपस्थित केला आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारणात नवा वाद उपस्थित झाला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल पाच तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे जनतेकडून स्वागत केले जात आहे. दरम्यान भाजपशासित अनेक राज्यांनीही कर कमी केल्याने आता महाराष्ट्र सरकार नेमका काय निर्णय़ घेतं, यावरुन राज्याच्या राजकारणात नवा वाद जन्माला आला आहे. याबाबतचाच हा स्पेशल रिपोर्ट…