फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार या दलदलीतून देशाला वाचवू शकतात
कोल्हापुरहून छगन भुजबळ यांना भेटायला आलेले खासदार संभाजी छ्त्रपती यांच्या भेटीत फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
कोल्हापुरहून छगन भुजबळ यांना भेटायला आलेले खासदार संभाजी छ्त्रपती यांच्या भेटीत फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी ओबीसी आरक्षणावरही खासदार संभाजी छत्रपती यांच्याबरोबर चर्चा झाली. या भेटीत खरी चर्चा झाली ती शाहू महाराजांची येणाऱ्या शताब्दीनिमित्त कार्यक्रमाचे नियोजन कसे करता येईल त्यासंदर्भातही चर्चा केली गेली. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी कोणता कार्यक्रम आखला जाणार आहे. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांना शाहू महाराजांनी दिलेले पाठबळ होते. त्यासाठी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी 6 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
