Chandrahar Patil : चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडणार; शिरसाट यांचं ठाकरेंना थेट आव्हान
Shivsena UBT : ठाकरेंना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे काय उपाययोजना करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
ठाकरेंना अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडणार आहेत. सोमवारी चंद्रहार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. ठाण्यात ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर मला शिंदेंच्या शिवसेनेतून ऑफर आहे पण त्याबद्दल मी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असं चंद्रहार पाटील यांनी याबद्दल सांगितलं.
ठाकरेंच्या शिवसेनेतले सांगलीतील नेते चंद्रहार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सोमवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ते हा पक्ष प्रवेश करणार आहेत. याबद्दल माहिती देताना संजय शिरसाट यांनी हा प्रवेश थांबवून दाखवा असंही आव्हान ठाकरेंना केलं आहे. त्यामुळे आता चंद्रहार पाटील काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Published on: Jun 04, 2025 05:16 PM
