Chandrakant Khaire : युती होणार? राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांबाबत चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?

Chandrakant Khaire : युती होणार? राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांबाबत चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jun 07, 2025 | 2:45 PM

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केलाय.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांबाबत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षासोबत युती करण्याबाबत गेल्या आठवड्यात मातोश्रीवर एक बैठक झाल्याचे समोर येत आहे. तर मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे हे युतीसाठी तयार असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती व्हावी यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची जबाबदारी ही अनिल परब यांच्यावर असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. ‘मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात मातोश्रीवर एक बैठक झाली. याबैठकीत सर्व नेते हजर होते. या नेत्यांच्या बैठकीत बरेच प्रश्न विचारले यावेळी अनिल परबांनी युती संदर्भात सवाल केला.’, असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

Published on: Jun 07, 2025 02:45 PM