माझी चेष्टा करणं राऊतांच्याच अंगलट येणार आहे- चंद्रकांत पाटील

माझी चेष्टा करणं राऊतांच्याच अंगलट येणार आहे- चंद्रकांत पाटील

| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 2:48 PM

केंद्रीय यंत्रणा आपलं काम करत आहेत. यात खूप काहीतरी होणार असल्याचं मला दिसतयं, असे सांगत, अशी डायरीत मिळत असेल तर चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केलीय.

मुंबई : शनिवारचा दिवस किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि निलेश राणे यांनी गाजवला. सोमय्यांच्या कोकण दौऱ्याने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. मात्र आज राजकारणात पुन्हा नवं ट्विस्ट आलंय. कारण यशवंत जाधवांची (Yashwant Jadhav) कथित डायरी चर्चेत आलीय. या डायरीत कुणी कुणाला कसे महागडे गिफ्ट दिले, याचा उल्लेख असल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय. तर चंद्रकांत पाटलांनीही (Chandrakant Patil) यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. केंद्रीय यंत्रणा आपलं काम करत आहेत. यात खूप काहीतरी होणार असल्याचं मला दिसतयं, असे सांगत, अशी डायरीत मिळत असेल तर चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केलीय. माझी राऊतांकडून चेष्टा केली जाते, मात्र जे म्हणतोय ते खरं ठरतयं ठरतं आहे. हीजण सुपात आहेत, काहीजणजात्यात आहेत. तर काही जणांचं पीठ झालं आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

Published on: Mar 27, 2022 02:48 PM