VIDEO : Chandrakant Patil | अधिवेशनामुळे अमित शाहांची भेट झाली नाही : चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीची चर्चा सध्या जोरात रंगल्या होत्या. पंकजा मुंडेही दिल्ली दरबारी दाखल होत्या. अशावेळी राज्यात भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदलाची शक्यता वर्तवली जात होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीची चर्चा सध्या जोरात रंगल्या होत्या. पंकजा मुंडेही दिल्ली दरबारी दाखल होत्या. अशावेळी राज्यात भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदलाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भेट नाकारल्याची चर्चा असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना एक्स्क्लुझिव्ह माहिती दिली आहे. दिल्लीत अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आम्ही फॉलोअप घेतला नाही. अमित शाहांनी भेट नाकारली यात काही अर्थ नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
