चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राख वाहिनी फुटली, राखयुक्त पाणी नदीत

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राख वाहिनी फुटली, राखयुक्त पाणी नदीत

| Updated on: Mar 02, 2022 | 12:39 PM

चंद्रपूर (Chandrapur) महाऔष्णिक वीज केंद्रातील राख वाहिनी फुटली आहे. वीज केंद्रातून राख साठवण तलावाकडे जाणारी राखवाहिनी फुटल्याने राखयुक्त पाणी नदीत मिसळले गेले.

चंद्रपूर (Chandrapur) महाऔष्णिक वीज केंद्रातील राख वाहिनी फुटली आहे. वीज केंद्रातून राख साठवण तलावाकडे जाणारी राखवाहिनी फुटल्याने राखयुक्त पाणी नदीत मिसळले गेले. प्रचंड वेगाने राख युक्त पाणी नदीत (River) जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या भागातून जाणाऱ्या राखवाहिन्या जुन्या व गंजलेल्या असल्याने वारंवार गळती होते. राख वाहिनी फुटल्याची महाऔष्णिक वीज केंद्र प्रशासनाने कबुली दिली. मात्र काही मिनिटांतच विसर्ग थांबवून राखवाहिनी गळती थांबवून दुरुस्त केल्याची माहिती दिली. या गळतीमुळे हजारो लिटर राखयुक्त पाणी (Water) थेट नदीत मिसळल्या गेल्याने प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Published on: Mar 02, 2022 12:39 PM