आरोप सिद्ध करा, नाहीतर…; रोहित पवारांच्या आरोपांवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर
चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांच्या आरोपांना तीव्र शब्दात उत्तर दिले आहे. त्यांनी 90 कोटींच्या दंडमाफीच्या आरोपाचा खंडन केला असून, ओबीसी आरक्षणाबाबत कोणताही अन्याय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांनी लावलेल्या 90 कोटी रुपयांच्या दंडमाफीच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की हा आरोप निराधार आहे आणि पूर्व महसूलमंत्र्यांनी फक्त स्थगिती दिली होती, दंड माफ केला नव्हता. त्यांनी रोहित पवारांना हा आरोप सिद्ध करण्याचे किंवा राजकीय सन्यास घेण्याचे आव्हान दिले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की फडणवीस सरकारने ओबीसींचे नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेतला नाही. उलट, ओबीसी मंत्रालय स्थापन करून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यासंदर्भात एका उपसमितीची बैठक 10 तारखेला बोलवण्यात आली आहे.
Published on: Sep 08, 2025 01:10 PM
