Chandrashekhar Bawankule : हा मेळावा सहानुभूती मिळवण्याचा ड्रामा होता; बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule : हा मेळावा सहानुभूती मिळवण्याचा ड्रामा होता; बावनकुळेंची टीका

| Updated on: Jul 05, 2025 | 7:19 PM

Chandrashekhar Bawankule On Thackeray Brothers : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर भाष्य करत टिकास्त्र डागलं आहे.

ठाकरे बंधूंचा मुंबईतील परळी येथे झालेला मेळावा हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा ड्रामा असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. अनेक वर्षांनंतर प्रथमच एकाच व्यासपीठावर आलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मेळाव्यावर जोरदार टीका केली.

यावेळी बावनकुळे म्हणाले, काही लोक ठाकरे बंधूंचं एकत्र येणं ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं सांगतात. पण हे एकत्र येणं सत्तेच्या राजकारणासाठी आहे, भावनिक बंधासाठी नाही. खरंच भावनिक एकी असती, तर ती कौटुंबिक समारंभात, लग्नात किंवा सणासुदीला दिसली असती. व्यासपीठावर एकत्र येणं ही केवळ राजकीय गरज आहे, असाही टोला त्यांनी लगावला. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणातील जातीय मुद्द्यावरही बावनकुळे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, राज ठाकरे दावा करतात की त्यांनी कधीच जातीय राजकारण केलं नाही. मग अनाजी पंत यांचा उल्लेख कोणासाठी होता? कोणत्या जातीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला? उद्धव ठाकरे यांनीही जातीय राजकारणाला खतपाणी घातलं असल्याची टीका यावेळी बावनकुळे यांनी केली.

Published on: Jul 05, 2025 07:19 PM