चांदवडमध्ये EVM घोटाळ्याची चर्चा; व्हायरल ऑडिओमुळे खळबळ

चांदवडमध्ये EVM घोटाळ्याची चर्चा; व्हायरल ऑडिओमुळे खळबळ

| Updated on: Nov 30, 2025 | 11:03 AM

चांदवड नगरपरिषद निवडणुकीत EVM मशीन डिल झाल्याचा दावा करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये राकेश अहिरे यांना एक कोटी रुपयांच्या बदल्यात ११ हजारहून अधिक मतं मिळवून देण्याची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चांदवड नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये EVM मशीन डिल झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश अहिरे यांना एक कोटी रुपये दिल्यास ११,००० हून अधिक मते मिळवून देण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा संवाद या क्लिपमध्ये ऐकू येतो. शक्ती ढोमसे यांनी राकेश अहिरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. या संभाषणात मतदानाचे आकडे आणि उमेदवाराच्या विजयावर परिणाम करण्याबद्दल चर्चा झाल्याचे दिसते. एका उमेदवाराला १३,६४२ मतांनी विजय मिळवून दिल्याचा उल्लेखही क्लिपमध्ये आहे. या व्हायरल क्लिपच्या सत्यतेची चौकशी करण्याची मागणी होत असून, यामुळे चांदवड निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Published on: Nov 30, 2025 11:03 AM