Chhagan Bhujbal : आरक्षण वादात भुजबळांच्या हेतूंवर संशयकल्लोळ, OBC नेत्यांनाच शंका तर शिष्यानेच केला सवाल

Chhagan Bhujbal : आरक्षण वादात भुजबळांच्या हेतूंवर संशयकल्लोळ, OBC नेत्यांनाच शंका तर शिष्यानेच केला सवाल

| Updated on: Oct 20, 2025 | 11:30 AM

मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर आता त्यांचेच शिष्य आणि इतर ओबीसी नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरक्षण निर्णयाबाबत सरकारवर न बोलता भुजबळ मराठा समाजाला लक्ष्य करत असल्याचा आरोप आहे. यामुळे ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झाला असून, भुजबळांचे हेतू काय, यावर चर्चा सुरू आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या राजकीय भूमिकेवर सध्या त्यांच्याच पक्षातील आणि ओबीसी नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सरकारने आरक्षण संदर्भात निर्णय घेतला असताना, भुजबळ सरकारवर टीका करण्याऐवजी मराठा समाजाला आणि मनोज जरांगेंना आव्हान देत असल्याचा आरोप होत आहे. भुजबळांचे शिष्य नवनाथ वाघमारे यांनी स्पष्टपणे त्यांच्या हेतूंवर शंका व्यक्त केली आहे. सरकारचा भाग असूनही भुजबळ सरकारविरोधात एकही शब्द बोलत नाहीत. तसेच, नागपूर येथील ओबीसी मेळाव्याला भुजबळ अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या स्वाभिमानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ओबीसी नेत्यांनाच लक्ष्य केल्यास समाजाचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

Published on: Oct 20, 2025 11:30 AM