Imtiaz Jaleel : ‘जिथे खड्डे खोदले तिथेच तुम्हाला पुरणार..’, वक्फच्या अधिकाऱ्यांना इम्तियाज जलील यांची धमकी
Imtiaz Jaleel Video : वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला विरोध करत संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांना धमकावलं असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून दमदाटी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जलील यांच्याकडून वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आलेली आहे. ‘जिथे खड्डे खोदले तिथेच तुम्हाला पुरणार..’ अशी धमकी जलील यांच्याकडून देण्यात आलेली असल्याचं कळतंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली होती. त्यानंतर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी त्या ठिकाणी जाऊन या कामाला विरोध करत काम बंद पडलं होतं. कार्यालयाच्या बांधकामासाठी याठिकाणी खोदण्यात आलेला खड्डा देखील यावेळी त्यांनी बुजवण्यास सांगितला होता. त्यानंतर आता जलील यांनी थेट वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून दमदाटी केल्याचं आणि अधिकाऱ्यांना धमकावल्याचं बघायला मिळालं. आहे.
Published on: May 01, 2025 10:42 AM
