CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार

| Updated on: May 19, 2021 | 1:11 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात जाणार असून तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. कोकणात वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. ठिकठिकाणी विजेच्या ताराही पडल्या आहेत. या वादळाचा सर्वात मोठा फटका महावितरणला बसला आहे. महावितरणचे कर्मचारी कोकणातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.