तिळगुळाची वाट न पाहता कामं केल्यास लोकं गोड बोलतात, मुख्यमंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

| Updated on: Jan 14, 2022 | 8:24 PM

महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी थेट व सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते, ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Follow us on

YouTube video player

मुंबई : गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम करा. शासकीय प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतु, त्याला छेद देणारा आजचा उपक्रम आहे. महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी थेट व सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते, ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.