आयोगाचे काम उत्तम पण आक्षेप व्यक्तीवर; चित्रा वाघ कोणावर बरसल्या

आयोगाचे काम उत्तम पण आक्षेप व्यक्तीवर; चित्रा वाघ कोणावर बरसल्या

| Updated on: Jan 09, 2023 | 3:02 PM

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांचे आरोप खोडून काढले होते. आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी चाकणकर यांनी वाघ यांना नोटीस बजावली होती. आणि त्याला उत्तर देण्याचे सांगितलं होते. त्यानंतर चित्रा वाघ विरूद्ध रुपाली चाकणकर असा सामना रंगला आहे

सोलापूर : मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. यावादात अनेकांनी उड्या घेत एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला उर्फीने देखील उत्तर दिलं आहे. त्यावरून हा वाद आणखीनच भडकला आहे. यादरम्यान चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. सोबतच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही तोफ डागली.

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांचे आरोप खोडून काढले होते. आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी चाकणकर यांनी वाघ यांना नोटीस बजावली होती आणि त्याला उत्तर देण्याचे सांगितलं होते. त्यानंतर चित्रा वाघ विरूद्ध रुपाली चाकणकर असा सामना रंगला आहे.

चित्रा वाघ यांनी नोटीसीवरून बोलताना, रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली. चाकणकर तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारात सोडवा. अभ्यास… अभ्यास करू नका. मी ही यापूर्वी आयोगावर होते. आपण आता आलात. तुम्ही नोटीस दिली त्याला उत्तर दिले आहे. ते उत्तर पण प्रसिद्ध करा. मी उत्तर आयोगाला दिलं आहे व्यक्तीला नाही. आयोग उत्तम काम करीत आहे व्यक्तीवर आक्षेप आहे, असंही त्या म्हणाल्या.

Published on: Jan 09, 2023 03:02 PM