फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? राजकीय वर्तुळात नेमकं घडतंय काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे एकाच वेळी सोफिटेल हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा होतांना दिसतेय. अशातच फडणवीस आदित्य ठाकरेंमध्ये कोणतीही भेट झाली नाही, अशी माहिती भाजपच्या सूत्रांमार्फत मिळतेय. तर मी मित्रांसोबत आलो होतो आमचा डिनर प्लॅन होता असं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे काल एकाच वेळी कार्यक्रमानिमित्त सोफिटेल हॉटेलमध्ये आले. दरम्यान फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ‘माझ्या मित्रसोबत माझा डिनर प्लॅन होता. डिनर आणि संगीत कार्यक्रम पूर्ण करून बाहेर आलो. माझ्या आणि फडणवीसांच्या भेटीच्या बातम्या ऐकत होतो. मात्र एक व्यक्ती बातम्या बघून गाडी निघून जाईल’, असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट झाली नाही, अशी भाजपच्या सूत्रांची माहिती आहे. तर यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, दोन नेते हे एका हॉटेलमध्ये होते ते भेटले की नाही हे दोन नेते सांगू शकतील. पण एक नक्कीच पण मिंधे गटांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा नक्कीच आला असं मला कोणीतरी सांगितलंय.
Published on: Jul 20, 2025 01:27 PM
