CM Fadnavis : हम किसी के बाप रे डरते नहीं…दादांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार अन् निवडणुकीत पाणी पाजण्याचा इशारा

CM Fadnavis : हम किसी के बाप रे डरते नहीं…दादांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार अन् निवडणुकीत पाणी पाजण्याचा इशारा

| Updated on: Jan 06, 2026 | 5:17 PM

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. विकासावरून प्रश्न विचारणाऱ्यांनी आरसा पाहावा, असे सांगत त्यांनी निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजण्याचा इशारा दिला. फडणवीस यांनी शहरातील ठेवींच्या आकडेवारीचा संदर्भ देत कामांचा अभाव अधोरेखित केला.

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “शरीफ है हम किसी से लढते नही, जमाना जानता है, हम किसी के बाप से डरते नही,” असे म्हणत फडणवीस यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पुण्यामध्ये विकासासंदर्भात प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा, असे आव्हान त्यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात 2015-16 पासूनच्या ठेवींच्या आकडेवारीचा संदर्भ दिला. तेव्हा 4844 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या, ज्या आता सुमारे 2000 कोटींपर्यंत खाली आल्या आहेत. सुमारे 8000 कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या गेल्या असतानाही शहरात अपेक्षित कामे दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. निवडणूक जवळ येत असताना, विरोधकांना निवडणुकीत “पाणी पाजणार” असा थेट इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. त्यांचा निवडणुकीचा फोकस पूर्णपणे विकासावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Published on: Jan 06, 2026 05:17 PM