‘समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली’ : मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर मधल्या सभेत स्पष्टच बोलले
छत्रपती संभाजीनगर मध्ये टॉल्क शो विथ देवाभाऊ या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट बद्धल सविस्तर माहिती दिली.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात सागळीकडे प्रचाराचे वारे वाहू लागलेत त्यातूनच छत्रपती संभाजीनगर मध्ये टॉल्क शो विथ देवाभाऊ या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट बद्धल सविस्तर माहिती दिली, त्यावर फडणवीस म्हणतात कि सर्वात पहिल्यांदा समृद्धी महामार्गाची संकल्पना 2001 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडली होती.दुर्दैवाने तो तेव्हा झाला नाही परंतु जशी, संधी मिळाली 2014 ला जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पुन्हा हि संकल्पना मुख्यमंत्र्यांकडून मांडण्यात आली होती. त्यावर फडणवीस म्हणतात मला मूर्खात काढण्यात आलं होतं, आहे तो रस्ता फक्त व्यवस्तीत करा.
याच छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन शरद पवार, आणि उध्दव ठाकरेंनी सभा घेऊन समृद्धीला एकही इंच जागा देऊ नका असं वक्तव्य करत फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली आहे.ज्या गावाला विरोधकांनी जागा देऊ नका असं सांगितलं त्यांनीच एका दिवसात जमिनी देऊन टाकल्या असं ही फडणवीस म्हणाले.समृद्धी महामार्ग अशा पध्दतीने तयार झालाय की, सगळ्यांना ह्या महामार्गाशी जोडायचं आहे.अशा पद्धतीने समृद्धी महामार्गाची संकल्पना छत्रपती संभाजीनगर मधल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
