Devendra Fadnavis : … तर आरक्षणाचा प्रश्न आतापर्यंत सुटला असता, जरांगे पाटलांबाबत फडणवीसांचे मोठं विधान
आरक्षण देण्यासाठी ज्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आरक्षण द्यावे लागेल. या प्रक्रिया पूर्ण न करता ते कसे शक्य आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केल्याचे पाहायला मिळाले. मराठा समाजाची मागणी आणि जरांगे यांची भूमिका यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जरांगे पाटील ज्या मागण्या करत आहेत त्याच्याकडे आम्ही सकारात्मकने पाहात आहोत. ते मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा अशी मागणी केली जात आहे. पण न्यायालयाचे काही निर्णय आलेले आहेत. या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली. ते स्टुडिओमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, जरांगेंना काय पटेल हे मी कसे सांगणार. मला त्यांच्या मनात शिरता आले असते तर आझाद मैदानावरील आंदोलनच संपले असते. म्हणजेच आरक्षणाचा प्रश्न आतापर्यंत सुटला असता असे त्यांनी खोचक भाष्य करत म्हटले.
