कोकाटेंबाबत निर्णय झाला! खाते बदल की राजीनामा? मोठी माहिती आली समोर

कोकाटेंबाबत निर्णय झाला! खाते बदल की राजीनामा? मोठी माहिती आली समोर

| Updated on: Jul 31, 2025 | 4:21 PM

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यांचा राजीनामा घेतला नाही, पण खाते बदलण्यात आले आहे. दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांना हे खाते मिळू शकते. माजी मंत्री धनंजय मुंडे देखील या खात्यासाठी उत्सुक आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

माणिकराव कोकाटे यांचं खाते बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा सरकारकडून घेण्यात आलेला नसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्यांचं खाते बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे रमीचा डाव कोकाटे यांना चांगलाच भोवण्याची शक्यता आहे. दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडील खातं माणिकराव कोकाटे यांना मिळेल अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात आज सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक झाली आणि याच बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, दुसरीकडे या कृषिखात्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून लॉबिंग सुरू असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा मंत्रिपद देण्याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Jul 31, 2025 04:20 PM