CM Fadnavis : धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागणार? मुख्यमंत्री म्हणाले, ते तीनदा मला भेटले पण…

CM Fadnavis : धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागणार? मुख्यमंत्री म्हणाले, ते तीनदा मला भेटले पण…

| Updated on: Aug 01, 2025 | 5:32 PM

धनंजय मुंडेंच्या भेटीगाठींनी भुवया उंचावल्या. मंत्रीपदासाठी मुंडेनी लॉबिंग सुरू केल्याचं दिसतंय. बुधवारी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि मुंडे यांच्यात बैठक झाली. त्यामुळे धनंजय मुंडेंकडून हालचाली सुरू झाल्याच्या चर्चा रंगत होत्या.

मागील एक-दोन दिवसांत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील अशी अटकळ राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनीच थेट उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिलाय. माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सध्या नो एन्ट्री… असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तुर्तात मंत्रिमंडळात एन्ट्री मिळणार नसल्याचं दिसतंय.

धनंजय मुंडे यांनी तीनवेळा आपली भेट घेतली. तीनदा ही वेगवेगळ्या विषयावर ही भेट झाली. त्यांच्यासोबतच्या कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाविषयीची चर्चा मी, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे करतो, असं स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सांगितलं.

Published on: Aug 01, 2025 05:32 PM