Santosh Bangar : कावड यात्रेत मुख्यमंत्री करणार 3 किमी पायी प्रवास…! संतोष बांगर यांची माहिती

Santosh Bangar : कावड यात्रेत मुख्यमंत्री करणार 3 किमी पायी प्रवास…! संतोष बांगर यांची माहिती

| Updated on: Aug 05, 2022 | 6:56 PM

शिवसेनेतून बंड केल्यानंतर आ. बांगर हे चांगलेच चर्चेत आले होते. आता जिल्ह्यातील कावड यात्रेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर दुसरीकडे न्यायालयीन लढा एकनाथ शिंदे हेच जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे कोर्टात निर्णयाचे आणि यात्रेत मुख्यमंत्र्याचे पायी चालणे याबाबत काय होणार हे पहावे लागणार आहे.

हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यात सुरु असलेल्या दौऱ्याला त्यांच्या आजारामुळे ब्रेक लागला आहे. मात्र, पुन्हा ते आपल्या दौऱ्याला सुरवात करतील असे आमदारांकडून सांगण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांनी तर एकनाथ शिंदे हे कावड यात्रेला तर उपस्थित राहणारच आहेत पण यासाछी ते दोन ते तीन किमीचा पायी प्रवासही करणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर आ. बांगर हे चांगलेच चर्चेत आले होते. आता जिल्ह्यातील कावड यात्रेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर दुसरीकडे न्यायालयीन लढा एकनाथ शिंदे हेच जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे कोर्टात निर्णयाचे आणि यात्रेत मुख्यमंत्र्याचे पायी चालणे याबाबत काय होणार हे पहावे लागणार आहे.

Published on: Aug 05, 2022 06:55 PM