CM Aurangabad Visit | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकडे रवाना

| Updated on: Sep 17, 2021 | 8:32 AM

सकाळी 8.45 वाजता मुख्यमंत्री हे सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 9 वाजता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि पैठण येथील संतपीठाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे.

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे सकाळी 7.30 वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. सकाळी 8.25 वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ येथे आगमन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय. मुख्यमंंत्र्यांच्या दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही विरोध केलाय.