Uddhav Thackeray | मी काही नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो; मोदी भेटीवरुन मुख्यमंत्र्यांनी फटकारलं

Uddhav Thackeray | मी काही नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो; मोदी भेटीवरुन मुख्यमंत्र्यांनी फटकारलं

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 9:59 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच भेटलो. मी काही नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे पत्रकारही काहीवेळ अवाक् झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेटली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी मोदींशी सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केल्याचीच अधिक चर्चा होती. त्यावरून प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकारांवरच संतापले. मोदींनाच भेटलो. मी काही नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

Published on: Jun 08, 2021 09:59 PM