राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक, नागपुरात कार्यकर्त्यांची निदर्शनं
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौथ्यांदा ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीविरोधात राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौथ्यांदा ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीविरोधात राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध भागात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शनं सुरू आहेत. नागपुरात कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात मोठी झटापट झाली. काहींनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. आमदार अभिजीत वंजारी हेसुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. “मोदी सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही उभे आहोत. ते आमच्यावर आघात करत आहेत,” अशी प्रतिक्रिया वंजारींनी दिली. यावेळी दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
