Harshvardhan Sapkal : आदिवासी बांधवांसाठी स्वतःच्या हातानं जेवण, नवे कपडे अन्… हर्षवर्धन सपकाळांची दुर्गम पाड्यावर अशी दिवाळी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची दुर्गम आदिवासी पाड्यावर अनोखी दिवाळी... आदिवासी बांधवांसाठी स्वतः हर्षवर्धन सपकाळ बनवतात जेवण... मागील 27 वर्षापासून सहपरिवार तीन दिवस आदिवासी पाड्यावर करतात अनोखी दिवाळी साजरी..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गेल्या 27 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या अतिशय दुर्गम अशा आदिवासी पाड्यात तीन दिवस सहपरिवार राहून दिवाळी साजरी करतात. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या भिंगारा, चाळीसटपरी सह गोमाल या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांसोबत सहपरिवार अनोखी अशी दिवाळी हर्षवर्धन सपकाळ यांनी साजरी केली. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसाठी स्वतः जेवण बनवलं तर आदिवासी बांधवांसाठी नवीन कपडे, औषधे, लहान मुलांसाठी पुस्तके घेतली. त्यांचा सोबत विविध चर्चा केली.
Published on: Oct 23, 2025 04:45 PM
