Harshvardhan Patil : CM फडणवीस यांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

Harshvardhan Patil : CM फडणवीस यांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

| Updated on: Dec 06, 2025 | 1:27 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे, त्यांना रबर स्टॅम्प आणि दरिंदा संबोधले आहे. महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शाह असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान फडणवीस यांनी दिल्लीश्वरांकडे गहाण ठेवला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच राज्याचे खरे मुख्यमंत्री आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे काम केवळ रबर स्टॅम्पसारखे असल्याचा आरोप देखील हर्षवर्धन पाटील यांनी केला. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यासंदर्भात बोलताना हर्षवर्धन पाटील यांची जीभ पुन्हा घरसल्याचे पाहायला मिळाले. हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांना दरिंदा, जल्लाद आणि गजनी असे संबोधत त्यांच्यावर गंभीर टीका केली. लोकशाहीच्या सर्व मूल्यांना ते फाशी देत असून, विसरण्याची सवय लागल्याने त्यांना गजनी म्हणावे लागते, असे पाटील यांनी म्हटले.

Published on: Dec 06, 2025 01:27 PM