आम्हाला निवडणूक बिनविरोध करायची होती, पण भाजपने निवडणूक लादली- सतेज पाटील

| Updated on: Mar 21, 2022 | 2:14 PM

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या  (Kolhapur North) पोटनिवडणुकीवरून कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (satej patil) यांनी भाजपवर (bjp) टीका केली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजपने लादली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. भाजपचे वरचे नेते अनुकूल होते. मात्र खालचे नेते अनुकूल नव्हते असं मला वाटतंय. या सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतो असं देवेंद्र […]

Follow us on

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या  (Kolhapur North) पोटनिवडणुकीवरून कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (satej patil) यांनी भाजपवर (bjp) टीका केली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजपने लादली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. भाजपचे वरचे नेते अनुकूल होते. मात्र खालचे नेते अनुकूल नव्हते असं मला वाटतंय. या सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी निर्णय जाहीर केला. आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय, असं सतेज पाटील यांनी सांगितलं. सतेज पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचेल आणि भाजपच्या कृत्यांचा पर्दाफाश होईल, असा दावाही त्यांनी केला.