‘जय बेळगाव, जय कर्नाटका’, मराठी नेत्याकडून कन्नडिगांचा जयघोष, महाराष्ट्र कर्नाटक वाद पुन्हा चिघळणार?

‘जय बेळगाव, जय कर्नाटका’, मराठी नेत्याकडून कन्नडिगांचा जयघोष, महाराष्ट्र कर्नाटक वाद पुन्हा चिघळणार?

| Updated on: Mar 05, 2023 | 11:10 PM

VIDEO | सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावना दुखवण्याचं काम, मराठी भाषिक संतप्त

बेळगाव : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख बेळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी जय बेळगाव आणि जय कर्नाटका असा नारा दिला. यामुळे त्यांनी सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावना दुखवण्याचं काम त्यांनी केल्याची टीका आता बेळगावमधील मराठी भाषिकांनी केली आहे. आमदार धीरज देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्र कर्नाटक वाद हा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनीही त्यांच्यावर टीका करत महाराष्ट्रातील नेत्यांनी आता पुन्हा कर्नाटकात येताना तुम्ही पक्षाच्या सूचना पाळणार की मराठी माणसांच्या भावना दुखवण्याचं काम करणार असा इशारा त्यांनी धीरज देशमुख यांना दिला आहे.

Published on: Mar 05, 2023 11:10 PM