Charanjit Singh Channi : सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव

Charanjit Singh Channi : सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव

| Updated on: May 04, 2025 | 10:30 AM

कॉंग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकविषयी केलेल्या व्यक्तव्यानंतर वादंग निर्माण होताच आता कॉंग्रेस खासदाराने आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलं आहे.

सर्जिकल स्ट्राईक बाबत केलेल्या वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराने घुमजाव केला आहे. वादानंतर कॉंग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी यांनी घुमजाव केला आहे. मी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले नाही, असं चरणजीत सिंग चन्नी यांनी आता म्हंटलं आहे. आम्ही सरकारसोबत असल्याचं चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हंटलं आहे. पुलवामानंतर सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा खासदार चन्नी यांनी केला होता. सर्जिकल स्ट्राईक कोणाला माहीत नाही. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं. वाद वाढल्यानंतर मात्र आता चरणजीत सिंग चन्नी यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केलं आहे. आम्ही सरकारच्या सोबत आहे. या हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळावा एवढीच आमची मागणी आहे. सर्जिकल स्ट्राईक बद्दल मी कोणताही पुरावा मागितला नाही, असं खासदार चन्नी यांनी स्पष्टीकरण दिलं.

Published on: May 04, 2025 10:30 AM