Congress Rally Controversy: मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा; भाजपनं काँग्रेसकडे मागितली माफी

| Updated on: Dec 16, 2025 | 10:27 AM

दिल्लीतील रामलीला मैदानावरील काँग्रेसच्या वोट चोर गद्दी छोड रॅलीत मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणा देण्यात आल्या. या घोषणेमुळे संसदेत मोठा हंगामा झाला. भाजपने काँग्रेस नेतृत्वाकडे, विशेषतः राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे देशाची माफी मागण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

दिल्लीत अलीकडेच काँग्रेसने वोट चोर गद्दी छोड या आरोपावरून रामलीला मैदानात एक मोठी रॅली आयोजित केली होती. या रॅलीदरम्यान काही महिला कार्यकर्त्यांनी मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नही तो कल खुदेगी अशा घोषणा दिल्या. या घोषणांचे पडसाद तात्काळ संसदेत उमटले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. भाजपने या घोषणांवर तीव्र आक्षेप घेतला. राज्यसभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि लोकसभेत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसकडून या घोषणेबद्दल माफी मागण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मृत्यूची कामना करणे अत्यंत निंदनीय असून काँग्रेस नेतृत्वाने देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. या घोषणेला सुरुवात करणाऱ्या महिलेचे नाव मंजूलता मीना असून, त्या जयपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या मते, त्यांनी सत्याला जनतेसमोर आणण्यासाठी हे म्हटले. या घटनेमुळे काँग्रेसने ज्या वोट चोरीच्या आरोपांवर लक्ष केंद्रित केले होते, त्याऐवजी मोदी तेरी कब्र खुदेगी या घोषणेवर अधिक चर्चा झाली.

Published on: Dec 16, 2025 10:27 AM